विश्व कल्याणाची आर्त हाक

80.00

विश्वकल्याणाची आर्त हाक-पसायदान
होवोनी अंतरंग अधिकारी । भावे अवलोकितां ज्ञानेश्वरी ।
साक्षात प्रकटे भगवान श्रीहरी । स्वये उद्धरी निजभक्ता ॥
स्वामी विद्यानंद महाराजांना ज्ञानेश्वरीची मुळात गोडी आणि पसायदानात विशेष गोडी. ज्ञानेश्वरीमाऊलींनी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर विश्वात्मक देवाला तू संतुष्ट झाला असल्यास पसायदान द्यावे अशी प्रार्थना केली. आणि कशासाठी केली? तर विश्वकल्याणासाठी! आणि कशी? आर्ततेने हाक देऊन! अन्‌ प्रार्थना काय? तर 1) जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूता परस्परे जडो । मैत्र जीवांचे । दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्मे सूर्य पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात । 3) आणि त्यासाठी ईश्वरनिष्ठांची मांदियाळीचीही प्रार्थना केली आहे.
हा ग्रंथ म्हणजे स्वामी विद्यानंदांची पसायदानावर केलेल्या प्रवचनांचे संकलन आहे. वास्तविक अनेक विचारवंतांनी पसायदानावर आपले विचार मांडले आहेत. तरीही प्रस्तुत ग्रंथाचे वेगळेपण आहे. त्यांत आत्मानुभूती आहे. परातत्त्वाचा स्पर्श आहे. स्वामी विद्यानंदांना श्रीज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत नामदेव, संत एकनाथ आदी संतांच्या साहित्याचा अभ्यास आहे. योगी अरविंदांचे तत्त्वज्ञान आत्मसात केले आहे. विषय समजावा म्हणून स्वामीजींनी अनेक उदाहरणे देऊन सोप्या सरळ व रसाळ भाषेत त्यांची मांडणी केली आहे. ग्रंथाच्या नावासह तो वाचकांना नक्कीच भावेल याची खात्री आहे.

Weight 0.200 kg
Dimensions 8 × 5 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विश्व कल्याणाची आर्त हाक”
Shopping Cart