स्वामी विद्यानंद सेवा मंडळ

आश्रम कसा आणि का?

तपोनिष्ठ महत् प्रेमाची पाखर मिळून श्रद्धावंताची आध्यात्मिक स्तरावरून सर्वकष उन्नती व्हावी ह्या हेतूने आश्रमाची उभारणी झाली आहे. हा मठ किंवा विहार नसून उत्क्रांतीचे माध्यम आहे.

अट

समर्पण भाव ही प्रमुख अट आहे. येथील सर्व वस्तू चैतन्याचे प्रगटीकरण ह्या भावनेतून बघणेच हिताचे आहे. कारण ते सत्य आहे. वस्तूवर मालकी हे अज्ञान आणि वस्तूतील भगवंत हे ज्ञान.

उद्दिष्ट

आंतरिक बदल घडवून आणणे. मनावरील काजळी झाडून आतील स्वयंतेज प्रगट होण्याकरता सुयोग्य मनोभूमिका तयार करणे. थोडक्यात भगवंतासाठी व भगवत्-जीवन जगण्याची क्षमता निर्माण करणे.

वर्तणूक

जप-तप-ध्यान ह्यांना व्यक्तिगत स्तरावर पूर्ण मोकळीक. तुम्ही कोणते काम करता ह्याला महत्त्व नसून काम कोणत्या भावनेने करता ह्याला महत्त्व आहे. म्हणून येथे उच-नीच-गरीब-श्रीमंत असा भेद नाही. शरीर हे भगवत्प्राप्तीचे साधन असा भाव असल्यामुळे येथे स्त्री-पुरुष, जात-पात असाही भेद नाही.

जाणीव

फुलांना, फळांना, तृणधान्यांना, भाजीपाल्याला तथा औषधी वनस्पतींना विशेष महत्त्व दिले जाते. आंतरिक सदगुणांचे प्रतिक ह्या वृक्ष-वल्ली असतात. देह मनातील असंतुलन घालवणाऱ्या म्हणून पूजास्थानी असाव्या. त्यांची सेवा ही ईश्वरसेवेसमान असतेत.

अपेक्षा

मद्यपान, धुम्रपान, वैषयिक संबंध तथा मांसाहार ह्याचे सेवन न करणे. शुद्ध शाकाहारी व सात्विक भोजन असावे. अन्नाचा वापर कसोशिने व शिस्तीत आणि आणि अन्न वाया जाणार नाही अशा पद्धतीने करावा. २४ तास शांत, आनंदी व प्रेमळ वातावरण राखणे. उच्छृंखलपणा नको. * देणग्या व अर्पण वस्तू निरपेक्ष सेवेचे प्रतिक म्हणून द्याव्या. प्रत्येकाने आश्रमाने घालून दिलेल्या शिस्तीत वागावे. ध्यान, भोजन, अल्पोपहार, ह्यांच्या वेळा सांभाळाव्या. अन्य वेळेत वाचन, बागकाम, शेतकाम आवडीनुसार करावे. आश्रम देणग्यावरच चालतो हे जाणून आपल्या वास्तव्यांच्या मोबदल्यात धन वा वस्तू देणगी म्हणून द्याव्या.

संपर्क

स्वामी विद्यानंद सेवा मंडळ

दिव्य जीवन वटिकाश्रम, हडपसर-सासवड मार्ग, वडकी १० वा मैल, जि. पुणे ४१२३०८

फोन: ७५८८८३८३४४, ९४०५३६६९७६, ०२०-२६९८९८६६

ई-मेल: swamividyananda2498@gmail.com

वेबसाईट: www.swamividyanand.co.in

Shopping Cart