आश्रम का व कसा?

परमानंदप्राप्तीची अवस्था बुद्धीच्या द्वारे बुद्धीच्या अतीत होऊन प्राप्त करून घेणे मानवी जीवनात शक्य आहे. थोडक्यात, खऱ्या सुखप्राप्तीकरिता मानवी जीवनात अध्यात्म हा अवश्यक असा भाग आहे. समर्थांनी म्हटलेच आहे-
‘ जयास वाटे सुखाची असावे | तेने रघुनाथ भजनी लागावे || ‘
(रघुनाथ भजन म्हणजेच अध्यात्म)

सद्गुरु मार्गदर्शन करित असतो. साधे व्‍यवसायिक स्‍वरूपाचे ज्ञान घेण्‍यकारिता शिक्षक लगतो तर सर्व विद्यांतील श्रेठ विद्या जी अध्‍यात्मविद्या तिच्‍या प्राप्‍तीकारिता सद्गुरु आवश्‍यक आहे हे नि:संशय. शिवाय साधनेतुन जी सुक्ष्म अवस्था प्राप्त होते, त्या सुक्ष्म अवस्थेत् योग्य नियमानची परम आवश्यकता असते. तसेच त्या अवस्थेत अनन्या शरणगती साधुं अहंकाराचे निर्मूलन व्हावे लागते. कुठला तरी गोता बसेल तो सांगता तरी नाही. म्हणून गुरुची आवश्यकता आहेच आहे.

मानवी जीवनात अध्यात्माचे आवश्यकता आहे काय ?
उत्तर : अध्यात्माची सगळ्यात मोठी आवश्यकता मानवी जीवनातच आहे. कारण, मानव हा बुद्धीने कार्य करतो व बुद्धीनेच सुखाची सर्व साधने उपलब्ध करून घेतो. भौतिक सुखाची साधने कितीही प्रमाणात चढत्या-वाढत्या श्रेणी मिळाली तरी तो खऱ्या अर्थाने सुखी होत नाही असे त्याला दिसून येते. हेही त्याला बुद्धीनेच कळते. त्यानंतर तो खर्या सुखाचा शोध घेण्यास प्रवृत्त होतो.

अध्यात्माचे अंतिम उद्देश काय ?
उत्तर : जीवनात सुख व दुःख या दोन्हींचे मिश्रण आहे. सुख आहे पण ते दुःखाच्या कोंदणात आहे. दुःख आहे पण तेही सुखाच्या वर्तुळात आहे. जणू काय सुख-दुःखाची वर्तुळे एकमेकांना छेद देऊन व पुन्हा एकमेकात मिसळून अखंड अशा साखळी सारखी आपल्याभोवती फिरत असतात. दुःख गेले तरी स्वरूपात बदल करून पुन्हा येते. पूर्णतः कधीच जात नाही. म्हणजेच आत्यंतिक दुःख निवृत्त होत नाही. सुख आले तरी ते निर्मळ असत नाही. शिवाय स्वयंभू असत नाही. दुसऱ्या कशावर तरी ते अवलंबून असते. चहा प्यायल्या शिवाय तरतरीतपणा येत नाही व विवाह केल्याशिवाय प्रपंच सुख मिळत नाही. तसेच या संपूर्ण आनंद घेऊ शकत नाही व विवाह संपूर्ण सुख देऊ शकत नाही. कशातूनही मिळतो तो साधा आनंद व साधे सुख. कितीही दुःख आदळी तरी सुख वा आनंद भग्न होणार नाही असा परमानंद केवळ अध्यात्मात अच् मिळू शकतो. म्हणून आत्यंतिक दुःख निवृत्ती व परमानंद प्राप्ती हाच अध्यात्माचा अंतिम उद्देश होय.

साधना म्हणजे काय?
उत्तर : आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचे आहे, त्याकरिता आपण विविध प्रयत्न करतो. जसे, परीक्षा पास व्हायचे असेल तर अभ्यास करतो. गाडी गाठायची असल्या सुहाना ची योजना करतो. विवाहा-सारखे मोठे कार्य करायचे असल्यास खूपच शिस्तबद्ध व आखीव स्वरूपाचा प्रयत्न करतो. अशाच प्रकारचा प्रयत्न ईश्वरप्राप्तीकरिता सुद्धा करावा लागतो. ईश्वरप्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात जास्त चिकाटीचा, यावर आधारित व सर्वस्व अर्पण करून करावा लागतो. म्हणजेच ते एक प्रकारचे तप असते. व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने, निष्ठेने व जिद्दीने हेतप करावे लागते. यालाच साधना असे म्हणतात. ह्या तापाचे बाह्यस्वरूप जप, ध्यान इत्यादी पासून तो आपण करीत असलेले सर्व कर्मजात इथपर्यंत असू शकते. पण आतील स्त्रोत मात्र तळमळीने भारावलेला असतो. तळमळ अर्थातच ईश्वरप्राप्तीची असते.

साधनेसाठी गुरुची आवश्यकता आहे काय ?
उत्तर : आवश्यकता आहे. एवढेच की प्रथम अंत:करणातून परमेश्वराची ओढ निर्माण होते त्यावेळी साधकाने आपल्या इच्छे येईल तो सदरग्रंथ वाचून त्याचे कार्य होऊ शकते. परंतु पुढे प्रत्यक्ष परमेश्वराच्या प्राप्तीकरिता शुद्ध, नेमके, थोड्या प्रयत्नात जास्तीत जास्त मिळवून देणारे असे साधन करणे हे आवश्यक होऊन बसते. ते कार्य सद्गुरूच करू शकतो.

Shopping Cart