सोहम ध्वनी श्री हनुमंत

॥ सोहम ध्वनी श्री हनुमंत ॥

सोऽहम् - ध्वनी अतिरुद्र वीर सुभगा, कल्पांत ओलांडिला ।
दैन्यत्वा दीनमुक्ति त्वाचि दिधली, श्री श्रेष्ठ संपादिला ॥१॥

केले निर्भय दुर्बलादि जन त्वा, कौशल्य संस्थापिले।
भक्तिचा घट, बांधणी करूनि त्या, आदर्शही निर्मिले ॥२॥

ईशाची घनता दिशांति भरली, काठिण्य प्राप्तिस त्या ।
कर्म, ज्ञान नि योग हे सकलही, अति क्षीण भेटीस त्या ॥३॥

योगाची प्रभुता सतर्क करूनी, मधु-अर्क त्वा काढिला ।
प्रेमाचे सत्-रेशमी सुत तया, बांधून त्वा नेमिला ॥४॥

चित्ताहंकृतिचे मना अतित जे, चैतन्य स्थायीपणे ।
ब्रह्मांडी निजबीज जे स्थिर असे, तेजत्व साक्षीपणे ॥५॥

स्थायी, साक्षी असे अनंत जे ते, ते तेच नादातुनि ।
सोऽहम्-ध्वनि जो नाद, नाम तव गा, विद्येत आनंदुनि ॥६॥

॥ ॐ ॥

प्रभु मज दे रे शांति परेची ।
मज स्फूर्त मूर्त घडवी रे सो ऽ हम् अंतरि वृत्ति झळाळो ।
तन मन निजरूप पाहो ।।

जे जे घडते कर्म जीवनी ।
सहज समर्पित करि रे अनुभव ऐसा क्षण क्षण वाढो ।
मी पण वितळुनि जावो ।।

सूक्ष्म सूक्ष्मतर जे जे भूवरी।
महा महातित करि रे विशाल डोंगर, सरिता, सिंधू ।
अंबर, वर्षा, घनही ।।

वृक्ष, लता, मनु, पशु, पक्ष्यादी ।
मूर्त हरीरूप करि रे

परा परात्पर परब्रम्ह प्रभू ।
नयनि निरंतर राहो ।।

ध्यान सुमंगल अनुभव सिद्धी।
सकल ब्रम्हमय करि रे विद्यानंदा सहज स्फूर्त प्रभू।
अदेह तुजसम लाहो ।।

स्थिरचर सुमधुर मंगल सृष्टी ।।
दिव्य शुभंकर करि रे ।।

Shopping Cart