मांडुक्य उपनिषद
मांडुक्य उपनिषद हे अथर्ववेदात आहे. या उपनिषदात 3 अध्याय व प्रत्येक अध्यायात 2 खंड असे एकूण 6 खंड आहेत. व त्यात एकूण 63 मंत्र आहेत.
या उपनिषदात शौनक ऋषींनी अंगीरस महाऋषींना असा प्रश्न केला कि, काय जाणले असता सर्व काही जाणले जाते? अंगीरसाने समग्र ब्रह्मविद्या या मांडुक्य उपनिषदाद्वारे कथन केली आहे. या उपनिषदात ओंकाराचे महत्व, सामर्थ्य आणि साधनेतले मांगल्य उत्कट प्रकारे ग्रथित केले ॐ असून म्हणजेच परब्रह्म ही जाणीव करुन दिली आहे. तसेच आत्म्यापासून आत्म्यापर्यंत होणारा ओंकाराचा चक्राकार प्रवास, ब्रह्मविद्येतील परा-अपरा, क्षरब्रह्म-अक्षरब्रह्म, गुहाचार, प्रणवोपासना, आत्मा व देह ह्यांचा संबंध आदी गुह्य तत्त्वांचे स्वानुभवाधारे केलेले सहज व सोपे विवेचन स्वामी विद्यानंदांनी केले आहे.
ऐतरेय उपनिषद
ऐतरेय उपनिषद हे ऋग्वेदात आहे. ऐतरेय उपनिषदात खालील विषय येतात.
1) मनुष्याच्या मन, बुद्धी, चित्त, वा वाणी यांचा विकास. 2) सत्य व ऋत यांचे विवेचन. 3) आत्म्याचे स्थान, सामर्थ्य व कार्य. 4) जीवाची उत्पत्ती, जीवाला शरीराची प्राप्ति व सर्व अवयवांची निर्मिती, आत्म्याचा देहाकडे प्रवेश. 5) आत्म्याच्या 3 अवस्था. आत्म्याचे 16 प्रकार व यांतून होणारे ज्ञान हेच प्रज्ञान.
Reviews
There are no reviews yet.