भावार्थ श्रीमत् भागवत एकादश स्कंध (एकनाथी भागवताच्या आधारे)
शुकदेवांनी रचलेला महान ग्रंथ म्हणजे श्रीमत् भागवत. भागवत म्हणजे भगवंताची भक्ती करणारा. सत्य, शिव व सौंदर्याने नटलेले श्रीमंत ईश्वरी तत्त्व प्रत्यक्ष नारायणाच्या हृदयातून जणू बाहेर असे सामर्थ्य संपूर्ण भागवतात उत्सर्जित झाले आहे. हा ग्रंथ पराभक्तीवर आरूढ झालेला आहे. जे भागवताच्या इतर स्कंधात आहे ते सर्व साररूपाने एकादश स्कंधात आले आहे व ते भक्ती व ज्ञानाच्या कोंदणात बसविले आहे. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी श्रीमत् भागवताच्या फक्त एकादश स्कंधावर भाष्य केले आहे आणि तेही समाज प्रबोधनासाठी. हे कार्य मराठीत घडले. नाथ भागवत हा ग्रंथ अनेक अर्थाने श्रेष्ठ, मंगल, तेजस्वी, महाज्ञानी तथा कुठल्याही काळात प्रबोधनकारक चिरंजीव स्वरूपाचा असा आहे. मुलत: तत्त्वज्ञानाचे विवेचन करणारा आहे. तथापि त्याची मराठी भाषा 400 वर्षांपेक्षा अधिक जुनी असल्यामुळे ग्रंथ समजण्यास सहजता येत नाही. तसेच एकनाथी भागवत हा ग्रंथ खूपच मोठा आहे. स्वामी विद्यानंदांनी हा ग्रंथ संक्षिप्त करुन सध्याच्या मराठी भाषेत सुलभ केला आहे.
1982 मधल्या चैत्र महिन्यातील श्रीस्वामींचे अनुष्ठान चालू असतांना ध्यानात श्रीराममूर्ती प्रकट झाली व नाथ भागवताचा भावार्थ साकीबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार हा श्री भावार्थ श्रीमत् भागवत-एकादश स्कंध ग्रंथ श्रीस्वामींनी लिहीला.
भावार्थ श्रीमत् भागवत (एकादश स्कंध)(Bhavarth Shrimat Bhagvat)
₹400.00 ₹240.00

Weight | 0.200 kg |
---|---|
Dimensions | 8 × 5 × 1 cm |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.