स्वरूपस्पंद (Swaroopsanda)

50.00 30.00

स्वरुपस्पंद
‘ स्वरुपस्पंद ‘ या काव्यसंपदेतील श्रीस्वामी विद्यानंदजींची नवनिर्मिती पाहून मन मंत्रमुग्ध होते . आविष्काराच्या दृष्टीने यातील काव्यरचनेमध्ये पुष्कळ विविधता आढळते. कधी तिने गेयतेचा साज धारण केला आहे तर कधी मनातील उत्स्फुर्त आर्तता अगदी मुक्तपणे मुक्तछंदातून व्यक्त झाली आहे . यात अष्टके , आरत्या यासारख्या रचनाही आहेत. यात विश्वोद्वाराची तळमळ आहे ; कधी आध्यात्मिक उच्च अनुभूती दिव्यता प्रधान करुन काव्यरुपाने मुखरित झाली आहे तर कधी स्वत:च्या आध्यात्मिक उच्च स्तराचा अस्मितापूर्वक उच्चार झाला आहे . पराभक्तीच्या स्तरावरुन अत्यंत समर्पित भावनेने तयार झालेली ही काव्यशिल्प . त्यांच्या अंगप्रत्यंगातून भक्ती , ज्ञान , प्रेम , वात्सल्य यांचाच प्रत्यय वाचताना येत राहतो . स्वतंत्र आणि उत्स्फुर्त असे या काव्याचे स्वरुप असल्यामुळे , अंत:करणाच्या अगदी गाभ्यामध्ये असणारा भागही येथे शब्दबध्द झाला आहे .या स्वरुपस्पंदाचा वेध घेता घेता मन नकळत ‘ स्व ‘ रुपाकडे ओढ घेऊ लागते ; यातच या काव्याचे श्रेष्ठत्व सामावले आहे , हे निश्चित !

Category:

Weight 0.100 kg
Dimensions 5 × 4 × 0.3 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वरूपस्पंद (Swaroopsanda)”
Shopping Cart